रत्नागिरी : खरिपाच्या शेतीला परतीच्या पावसाचा तडाखा बसून नुकसान झाले. मात्र, शेतकरी राजा या नुकसानीतून सावरत रब्बी हंगामातील शेतीमध्ये गुंतला आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणी वायंगणी शेतीवर भर दिला जात आहे. विविध फळभाज्यांसह कुळीथ व कडधान्याच्या पेरण्या झाल्या असून, शेतांमध्ये रोपांची रूजवात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी राजा पुरता बेजार झाला. अशा स्थितीतही नाराजी झटकून नव्या उमेदीने शेतकरी राजा रब्बी पीक घेण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुक्यातील शेतकरी सध्या वायंगणी शेतीवर भर देत आहे. त्यामुळे या उत्पन्नात उदरनिर्वाहासह पौष्टिक पालेभाजा, कडधान्य खायला मिळणार आहे. मार्गशीर्ष महिना व्रतवैकल्याचा असल्याने शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 09/Dec/2025












