रत्नागिरी : चिपळूण -गुहागर रस्त्यावरील जानवळे फाटा येथे इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल, तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशारितीने कार (एमएच-०४-डीजी-४०३४) उभी करणाऱ्या चालकाविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वा. करण्यात आली. गौरव महेश कारकर (वय २१, रा. झोंबडी कारकरवाडी, गुहागर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस शिपाई प्रितेश रहाटे यांनी तक्रार दिली आहे. गौरव कारेकर असे कारचालकाचे नाव आहे. कार चिपळूण-गुहागर रस्त्यावरील जानवळे फाट्यासमोर इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने उभी केली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 12/Dec/2025












