चिपळूण :-आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची पूर्व तयारी करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपाचे नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कामथे येथील भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात बैठक संपन्न झाली.
या बैठकीत प्रामुख्याने या दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांनी प्रदेश कार्यालयाकडून आलेला फार्म मंडल अध्यक्षांकडे भरून द्यावा. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील बैठकांचे नियोजन करणे, लवकरात लवकर उमेदवार जाहीर करून प्रचाराची रणनीती ठरविणे या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत तिन्ही नेत्यांना आलेले अनुभव तिन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, चिपळूण ग्रामीण अध्यक्ष विनोद भुरण, पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 12/Dec/2025












