चिपळूण तालुका मुस्लिम समाज संघटनेला निधी देणार : शरद पवार

चिपळूण : चिपळूण तालुका मुस्लिम समाज संघटनेला आवश्यक निधी देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज चिपळूण दौऱ्यावर होते. गुहागर बायपास रोडवर चिपळूण मुस्लिम समाज संस्थेतर्फे कम्युनिटी सेंटरची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पाला शरद पवार यांनी भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष सलीम कासकर, कार्याध्यक्ष नाझीम अफवारे, सेक्रेटरी फैयाज देसाई, सहसेक्रेटरी मुराद अडरेकर, सदस्य डॉ. अब्बास जबले, इब्राहिम दलवाई यांच्यासह संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. गुहागर बायपास येथे मुस्लिम समाज संघटनेतर्फे अत्याधुनिक कम्युनिटी सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातून कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, याची माहिती शरद पवार यांनी घेतली.

प्रकल्पाचे काम किती टक्के झाले आणि अजून किती काम शिल्लक आहे त्यासाठी किती निधीची गरज आहे. मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारचा अल्पसंख्याक विभाग कार्यरत आहे. त्यातून वेगवेगळ्या उपक्रमांसाठी निधी दिला जातो. हा मुस्लिम समाजाचा हक्काचा निधी असतो. तो या संस्थेने मिळविला आहे का? याची माहिती शरद पवार यांनी घेतली. तसेच भविष्यातील सर्व उपक्रमांना सहकार्य करून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. माजी आमदार रमेश कदम, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हाध्यक्ष बारक्या बने, निरीक्षक बबन कनावजे, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 24/Sep/2024