लांजा : विजांच्या कडकडाटासह कोसळल्या मुसळधार पावसामध्ये प्रचंड कडकडाट करत वीज घराच्या चौथऱ्यावर कोसळल्याची घटना लांजा शहरातील धुंदरे येथे घडली आहे. माजी उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या घराच्या चौथऱ्या वर वीज पडली.
सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा तालुक्यात जोर पकडला आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यात भात शेतीची दाणादाण उडवली आहे.गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाट करीत धुंदरे गावातील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या घराच्या चौथ्यावर ही वीज कोसळली. घटनेत घरातील माणसे बालंबाल बचावली आहेत. अंगणात असलेल्या माणसांनी घरात धुम ठोकल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
या घटनेत घराच्या चौथ्यावर खड्डा पडल्याचे दिसून येत आहे. वीज पडल्याने सोलर पंप जळून गेल्याचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 02-11-2024