रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे खुल्या गटासाठी खेळाडूंची 25 रोजी निवड चाचणी

रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या खुल्या गट सामान्यांकरिता करिता रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे खुल्या गटासाठी खेळाडूंची निवड चाचणी बुधवार दिनांक 25.12.24 ला सावंत क्रिकेट ग्राउंड कोळंबे येथे होणार असून खेळाडूंनी सकाळी 8.30 वाजता हजर रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण सामंत, कार्यवाह श्री. दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, सचिव श्री. बिपिन बंदरकर यांनी केले आहे.

या निवड चाचणी करिता येताना दोनशे रुपये फी, आधार कार्ड, जन्म दाखला सोबत घेऊन यायचे आहे.

अधिक माहितीकरिता सहसचिव श्री मनोहर गुरव 9890747525 व सहसचिव बलराम कोतवडेकर 9921003394 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:58 24-12-2024

Khabardar diwali fest