रत्नागिरीत २० मे रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या २० मे रोजी करण्यात आले आहे.

हा मेळावा २० मे रोजी सकाळी १० वाजता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रभारी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

जिल्ह्यातल्या सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करावे. २० मेच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 08-05-2026

Tata SUV