भाट्ये स्वीमथॉनमध्ये ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’चा झंझावात; ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव

​रत्नागिरी | विशेष प्रतिनिधी :
रत्नागिरीच्या ऐतिहासिक भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर रविवारी, १० मे २०२६ रोजी पार पडलेली ८ वी राज्यस्तरीय स्वीमथॉन स्पर्धा ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ने अक्षरशः गाजवली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच ३४ खेळाडू उतरवून विक्रम करणाऱ्या या ग्रुपने तब्बल १८ पदके पटकावत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. श्री. डॉ. उदयजी सामंत साहेब यांनी या स्पर्धेला विशेष उपस्थिती लावून विजेत्या खेळाडूंना स्वहस्ते बक्षीस वितरण केले.

स्पर्धेचे मानकरी: सहभागी व विजेते खेळाडू
​या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील पहिल्या ५ क्रमांकांमध्ये या ग्रुपच्या ४ ते ५ मुलांनी बाजी मारली. सहभागी खेळाडूंची नामावली खालीलप्रमाणे आहे:
​G 10 (मुले): अधिश जाधव, इझान कापडी, वेदांशु कुबल.
​G 10 (मुली): आराध्या शिंदे, याश्वि जैन, श्रीशा शिंगाडे, इरा भाटवडेकर, साईशा भोपळे, अनाया शिंगाडे.
​G 9 (मुली): बीना तेंडुलकर.
​G 8 (मुले/मुली): मल्हार सुतवने, श्रीपाद मयेकर, त्रिशा भुजबळराव.
​G 6 (मुले): अल्फाराज कापडी, विशाल कुबल.
​G 5 (मुले): करण मिलके, आयुष काळे, योगेंद्र तावडे, श्रीयश विलनकर.
​G 5 (मुली): तनाया मिलके, सानवी पवार, आरोही पिलनकर, संस्कृती जाधव.
​G 4 (मुले/मुली): आयुष कताळे, निधी भिडे.
​G 3 (मुले): शौर्य राऊत.
​G 2 (मुले/मुली): अर्णव पिलणकर, अर्ह भाटकर, सर्वदा लिंगायत.
​G 1 (मुले): रिहान लाड, योगेश हरचेकर.

​महाराष्ट्रातील एकमेव विक्रमी ग्रुप!
​एकाच स्पर्धेत एकाच प्रशिक्षण केंद्राचे ३४ खेळाडू उतरवण्याचा विक्रम करत महेश मिलके ग्रुपने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भरघोस यश आणि १८ पदकांची कमाई यामुळे हा ग्रुप स्पर्धेच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.

​”पालकमंत्री ना. डॉ. उदयजी सामंत साहेबांच्या हस्ते आमच्या मुलांचा गौरव झाला, हा त्यांच्या कष्टाचा सर्वात मोठा सन्मान आहे. प्रत्येक वयोगटात मुलांनी मिळवलेले यश त्यांच्या नियमित सरावाचे फळ आहे.”
— प्रशिक्षक महेश मिलके

​या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शक महेश मिलके यांचे रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:29 11-05-2026