मंडणगड,(प्रतिनिधी):मंडणगड तालुक्यातील नारगोली प. वाडी येथे शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२०२६ अंतर्गत मंजूर झालेल्या पाणी साठवण टाकी बांधकाम कामाचे भूमिपूजन रविवारी, दि.१० मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
या विकासकामासाठी सुमारे ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामामुळे परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी अशा मूलभूत सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी अस्मिता केंद्रे जिल्हा अध्यक्ष, प्रताप घोसाळकर जिल्हा परिषद सदस्य, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. व चिले सभापती, दीपक मालुसरे उपसभापती, सुनील चिंचघरकर शाखाप्रमुख, दर्शना साळुंखे उपसरपंच, सिद्धेश देशपांडे शिवसेना सचिव मंडणगड तालुका, आदेश केणी संपर्क प्रमुख शिवसेना मंडणगड, संजय शेडगे तालुका प्रमुख यांची उपस्थिती लाभली.तसेच संतोष सागवेकर नारगोली पूर्व वाडी अध्यक्ष, तंटामुक्त अध्यक्ष संतोष काजारे, पांडुरंग घडवले, मोहन पाष्टे, नथुराम मोहिते, दिलीप साळुंखे, सचिन घडवले, शैलेश माटवणकर, सुशील वजीरकर, सुदर्शन वजीरकर, रवींद्र चिंचघरकर, विजय पवार, प्रदीप पवार, केशव पवार,सुनील घाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, महिला मंडळ, युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात आणखी विकासकामे करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 13-05-2026














