Ratnagiri : रत्नागिरी जिल्‍ह्यात चार नव्‍या रेशन दुकानांना मंजुरी

रत्‍नागिरी : जिल्‍हा पुरवठा विभागाच्‍या वतीने रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील चार तालुक्‍यांतील चार रेशन दुकानांना नव्‍याने मंजुरी दिली आहे. त्‍यामध्ये दापोली, खेड, रत्‍नागिरी आणि संगमेश्वर तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. लवकरच या गावात रेशन दुकान सुरू होणार आहेत. जिल्‍ह्यात एकूण ८६२ रेशन दुकाने सुरू असल्‍याची माहिती जिल्‍हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.वृत्त संकलन

रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील रिक्त आस्‍थापना व नव्‍याने मागणी असलेल्‍या रास्‍त धान्य दुकानांसाठी जिल्‍हा पुरवठा विभागाच्‍या वतीने जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. जिल्‍ह्यातील रेशन दुकानांना गावात परवानगी देण्यात आली होती. दरम्‍यान, नुकतीच सर्व प्रक्रिया पार पडली असून जिल्‍ह्यातील चार तालुक्‍यांतील गावात नव्‍याने रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. येत्‍या काही दिवसांत नवीन रेशन दुकान सुरू होणार असल्‍यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी १३ गावांत नव्‍या रेशनदुकानांना परवानगी

जिल्‍हा पुरवठा विभागाच्या वतीने यापूर्वी जिल्‍ह्यात रास्‍त भाव दुकनांना ७२ गावांत परवानगी देण्‍यात आली होती. अर्ज प्रक्रिया छाननी होऊन तब्‍बल १३ गावांत नव्‍या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 13-05-2026