आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर

रत्नागिरी: परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तसेच द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन च्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

१३ मे रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथील ब्लड बँकेत पार पडले. या उपक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच चौगुले डॉकयार्ड, जयगड येथूनही तब्बल पंचवीस जण विशेषतः रक्तदानासाठी रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी आपला सहभाग नोंदवला.

या प्रसंगी आयोजिका व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका अॅड. सौ. जया उदय सामंत यांच्यासह आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षिका विनीता गोखले, भूवना महागावकर तसेच आर्ट ऑफ लिविंग साधक राजेश भुर्के, संजीवनी मोरे, वैभव भुर्के, सीमा पटवर्धन, प्रमोद खेडेकर, वैभव पालकर, सचिन पवार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 13-05-2026