रत्नागिरी: भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात आपले पक्षसंघटन अधिक बळकट आणि विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्हयातील विविध प्रकोष्ठांच्या (सेल) संयोजकांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. यामध्ये अनुभवी नेत्यांसह नव्या दमाच्या तरुणांनाही संधी देण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ही बांधणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘सेल’ची यंत्रणा
पक्षसंघटन अधिक सक्षम, प्रभावी आणि पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी प्रशांत यादव यांनी ओबीसी, अल्पसंख्यांक, किसान, युवा आणि महिला मोर्चांच्या अध्यक्षांची निवड केली होती. आता या प्रक्रियेला अधिक गती देत ‘अनुसूचित जमाती मोर्चा’च्या जिल्हाध्यक्षपदी संदीप भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकोष्ठ (सेल) आणि नवनियुक्त जिल्हा संयोजकांची यादी:
खालीलप्रमाणे विविध आघाड्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत:
- आध्यात्मिक आघाडी: संजय साळवी
- मच्छीमार सेल: अभय लाकडे
- आयटी सेल: अनिरुद्ध फळणीकर
- सोशल मीडिया सेल: संदेश ओक
- शिक्षक सेल: अभिजित सप्रे
- कामगार आघाडी: राजू मयेकर
- मजूर सेल: अजित पवार
- सहकार आघाडी: राजन पटवर्धन
- क्रीडा सेल: दत्ता नार्वेकर
- सांस्कृतिक सेल: हेरंब जोगळेकर
- शिक्षक सेल: अभिजित सप्रे
- कायदा सेल: मिलिंद तांबे
- वैद्यकीय/आयुष्यमान भारत: पुंडलिक पावसकर
- बेटी बचाओ बेटी पढाओ: सौ. मृणाल घटे
- बचत गट समन्वयक: सौ. अनुष्का शेलार
इतर प्रमुख नियुक्त्या: बुद्धिजीवी सेल (सदानंद भागवत), पदवीधर (मनोज पाटणकर), ग्रामविकास (नरेंद्र बेलवलकर), ट्रान्स्पोर्ट (नंदकुमार चव्हाण), ज्येष्ठ कार्यकर्ता (राजेंद्र फाळके), दक्षिण भारतीय सेल (विजयकुमार नाडर), भटके विमुक्त (संतोष केदारी), जैन प्रकोष्ठ (अमित जैन), गो माता संरक्षण (अविनाश गुरव), एनजीओ (भगवतसिंह चुंडावत), व्यवसाय सेल (प्रमोद खेडेकर), औद्योगिक सेल (गजानन जाधव), रेल्वे सेल (शंकर शिंदे), रिक्षा ड्रायव्हर सेल (अजय शिंदे), कोकण विकास सेल (डॉ. चंद्रशेखर निमकर), चित्रपट-नाट्य सेल (सौ. सीमा रानडे), सार्वजनिक गणपती मंडळ (महेश महाडिक), पशुसंवर्धन (जयेश विचारे), अभियांत्रिकी (अभिषेक साळुंके), एक भारत श्रेष्ठ भारत (अभय चितळे), फ्रेंड्स ऑफ बीजेपी (तेजस शिंदे), बँकिंग (रत्नदीप देवळेकर), केमीस्ट व फार्मासिस्ट (मधुकर निमकर), युवा वॉरियर (अभिषेक जागुष्टे) आणि मीडिया सेल (रूपेश आवले).
पक्षाची धोरणे घराघरांत पोहोचवणार: प्रशांत यादव
या नियुक्त्यांनंतर जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “पक्षाचे विचार आणि शासनाच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व संयोजक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास मला आहे,” असे श्री. यादव यांनी यावेळी नमूद केले.
या नियुक्त्यांमुळे भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण असून, संघटनात्मक पातळीवर पक्षाला मोठी उभारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.














