संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात रानडुक्कर माकडे, गवे आदी जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी शेती सोडण्याच्या तयारीत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लोवले या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
प्रगतशील शेतकरी अप्पा पाध्ये म्हणाले, बदलत्या वातावरणाप्रमाणे बियाणी बदलत असली तरी शेतीवर पडणाऱ्या अनेक रोगांवर पुरेशी औषधे अथवा माहिती नसल्याने शेतकरी संभ्रमात असतो. अनेक वेळा वर्षभर राबूनही शेती पूर्णपणे वाया जाते. गरीब शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे वापरणे कठीण होते. त्यामुळे शेतकरी शेती सोडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी आशिष भिडे यांनी लहरी पावसामुळे अनेकवेळा शेतीचे मोठे नुकसान होते. शेती करत असताना जंगली जनावरे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी शांताराम जाधव म्हणाले, शेती चांगल्या प्रकारे होते, मात्र माकडे, गवे आणि इतर जंगली प्राणी शेतीचे मोठे नुकसान करतात. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले असून शेती परवडत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 02/Nov/2024