रत्नागिरी : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १८ मे रोजी

रत्नागिरी : मे २०२६ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीच्या सदस्य सचिवांनी दिली.

जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या उपक्रमांतर्गत महिलांना त्यांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय समस्यांबाबत थेट प्रशासनासमोर निवेदन सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.महिला लोकशाही दिनात अर्जदार महिलांनी स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारी आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येणार आहेत.महिलांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण व्हावे आणि प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 15-05-2026

Tata aeris