रत्नागिरी : स्थानिक उत्पादने, उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो, त्या परिसरात एकूण २२ ठिकाणी प्रगती केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी ‘एमएसआरडीसी’ची (महाराष्ट्र स्टेट रिडेव्हलपमेंट कार्पोरेशन) विशेष नियोजन विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये कोकणातील १५ तालुके व १०५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील आंबोळगड, दापोली तालुक्यातील देवके गुहागर तालुक्यात दोडावन, नवीन गणपतीपुळे, रायगड जिल्ह्यात दिघी, माजगाव, न्हावे, रोहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, नवीन देवगड, रेडी तर पालघर जिल्ह्यात वाढवण, केळवा या २२ ठिकाणी नव्याने विकसित करण्यात येणारी प्रगती केंद्रे निर्माण केली जाणार आहेत.
ही केंद्रे तयार करताना प्रत्येक ठिकाणी असलेली पर्यटन व त्या क्षेत्रात असलेला आंबा, काजू आदी स्थानिक पातळीवरील नैसर्गिक उत्पादनांचाही विचार करून त्या ठिकाणी उद्योग, पर्यटन, सरकारच्या नवीन योजना, रोजगार निर्मिती या दृष्टीने या केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 02/Nov/2024