रत्नागिरी : भाजपच्या वतीने आज बुद्धिजीवी वर्ग संमेलनाचे आयोजन

रत्नागिरी, दि. १३ जून : भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी (दक्षिण) यांच्या वतीने आज शनिवार, १३ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजता रत्नागिरी येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे “बुद्धिजीवी वर्ग संमेलन २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी पूर्ण केलेल्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाच्या निमित्ताने या विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, “विश्वास, विकास आणि जनकल्याण” या विषयांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद जठार तसेच सचिन वहाळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, व्यावसायिक, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, देशाच्या विकासाचा प्रवास आणि आगामी काळातील राष्ट्रनिर्मितीमध्ये बुद्धिजीवी वर्गाची भूमिका यावर सखोल चर्चा होणार आहे.

Mahrashi karve ANM

या संमेलनास जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 13-06-2026