जयगड पोलिसांची वाटद-मिरवणे रस्त्यावर कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
रत्नागिरी :
Ratnagiri Crime News प्रकरणी सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या एका ४८ वर्षीय प्रौढाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील वाटद ते मिरवणे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
उभेपाटवाडी येथील संशयितावर जयगड पोलिसांची कारवाई
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश शितप (वय ४८, रा. उभेपाटवाडी वाटद, ता. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आठवले यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
दाखल तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी संशयित नागेश शितप हा कोणताही वैध दारू पिण्याचा परवाना नसताना वाटद ते मिरवणे रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:36 14-08-2026














