संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक सज्ज
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम असून, मुसळधार पावसानंतर खेडमधील पूरस्थिती सोमवारीही कायम राहिली. दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १ हजार ४९३.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मंगळवारसाठी भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ७ जुलै राेजीही शाळा-महाविद्यालयांना सलग दुसर्या दिवशीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 07-07-2026













