Amhi Siddha Lekhika Election 2026: ‘आम्ही सिद्ध लेखिका’च्या अध्यक्षपदी प्रा. पद्मा हुशिंग यांची पुनर्नियुक्ती; रत्नागिरीच्या सुनेत्रा जोशी सहसचिव

ठाण्यात पार पडली पहिली पंचवार्षिक बिनविरोध निवडणूक; कोकणातील दोन महिला लेखिकांची मध्यवर्ती कार्यकारिणीत निवड

रत्नागिरी:

Amhi Siddha Lekhika Election 2026 अंतर्गत ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या राज्यस्तरीय संस्थेची वार्षिक सभा आणि पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत ठाण्याच्या प्रा. पद्मा हुशिंग यांची संस्थेच्या मध्यवर्ती अध्यक्षपदी एकमताने पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे येथील ‘ज्येष्ठांचे नंदनवन सभागृह’, लुईस वाडी येथे अॅडव्होकेट उमा धापटे यांच्या मार्गदर्शनाखाली, नयना सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वासंती वर्तक यांच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

बिनविरोध जाहीर झालेली नवी कार्यकारिणी

सचिव वृषाली राजे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली.

नवनिर्वाचित प्रमुख पदाधिकारी:

  • अध्यक्ष: प्रा. पद्मा हुशिंग (ठाणे)
  • उपाध्यक्ष: शुभांगी गान (नागपूर)
  • कार्याध्यक्ष: यामिनी पाठक (पुणे)
  • सचिव: मानसी जोशी
  • सहसचिव: सुनेत्रा जोशी (रत्नागिरी) आणि प्रा. स्नेहल पाठक (मराठवाडा-बीड)
  • खजिनदार: प्रतिभा चांदुरकर (ठाणे)
  • सहखजिनदार: अस्मिता चौधरी (ठाणे)

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून माधुरी नवरे (डोंबिवली), वैशाली जोशी (डोंबिवली), देविका देशमुख (अकोला), मनीषा पाटील (सांगली), माधुरी चौधरी (संभाजीनगर), कविता कठाणे (विदर्भ), ऋतुजा उमेश कुळकर्णी (रत्नागिरी), संध्या प्रमोद महाजन (जळगाव) आणि ज्योती राजन टिपणीस (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली.

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा

या निवडणुकीत ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी (रत्नागिरी) यांची मध्यवर्ती संस्थेच्या सहसचिवपदी निवड झाली आहे. तर ऋतुजा उमेश कुळकर्णी (रत्नागिरी) यांची मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य आणि प्रसिद्धी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्यांमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील महिला साहित्यिक व लेखिका चळवळीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे.

साहित्यिक उपक्रम व्यापक करण्याचा संकल्प

संस्थेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून येणे हे परस्पर विश्वास आणि एकजुटीचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील महिला लेखिकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या साहित्यिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि राज्यभरात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 17-08-2026