रत्नागिरी : हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या फळ शेतीचा हवामानावर आधारित पीक विमा काढावयाचा आहे त्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेशी संपर्क साधून ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या आंबा / काजू फळबागेचा पीक विमा काढावयाचा आहे किंवा नाही याबाबत बँकेला अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.

जे शेतकरी कोणत्याही बँकेचे कर्जदार नाहीत; परंतु त्या शेतकऱ्यांना पीक विमा काढावयाचा आहे, त्यांनी जवळील सीएससी केंद्राशी किंवा शाखेशी संपर्क साधावा. बैंक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे अन्यथा बँक त्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्याचा विमा काढेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, मुकुंद खांडेकर यांनी केले आहे.

काजू फळपिकासाठी १ लाख २० हजार रुपये आणि आंबा फळपिकासाठी १ लाख ७० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. कर्जदार शेतकऱ्यांकरिता कर्जदार असलेल्या बँकेला पीक विमा काढण्याचे पत्र देणे व स्वतःचा सातबारा नसल्यास नोंदणीकृत करार, कर्जदार नसलेले शेतकऱ्यांनी मागणी अर्ज, ७/१२ व ८अ, डीबीटी इनेबल बैंक पासबुक झेरॉक्स सहीसह, डिक्लेरेशन सादर करावयाचे आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान आधारित पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:42 PM 07/Nov/2024