ग्रामीण भागात ४जी नेटवर्क विस्तार आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर
BSNL Independence Day Offers अंतर्गत भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी विविध डिजिटल सेवा, नेटवर्क विस्तार आणि विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. देशभरात २६,३०० हून अधिक अतिरिक्त ४जी बीटीएस साइट्स तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांत ४जी नेटवर्कचा मोठा विस्तार होणार आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान भविष्यात ५जी साठीही सक्षम असल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे.
बीएसएनएलच्या प्रमुख ऑफर्स आणि प्लॅन्स:
- ‘फ्रीडम २.०’ ऑफर: नवीन ग्राहकांसाठी केवळ १ रुपयात ‘फ्रीडम २.०’ (Freedom 2.0) ऑफर सादर करण्यात आली आहे. यामध्ये २४ दिवसांची वैधता, दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत.
- ‘फायबर फ्रीडम’ ब्रॉडबँड प्लॅन: ब्रॉडबँड ग्राहकांसाठी ₹१,९९९ मासिक शुल्काचा ‘फायबर फ्रीडम’ प्लॅन आणला आहे. यामध्ये २०० Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड, ५,००० जीबी मासिक डेटा आणि २५ हून अधिक प्रीमियम ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मचे मोफत सदस्यत्व दिले जाईल.
- वार्षिक प्रीपेड प्लॅनवर अतिरिक्त वैधता: ₹२,३९९ च्या वार्षिक प्रीपेड प्लॅनवर मर्यादित कालावधीसाठी ४७ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. त्यामुळे या प्लॅनची एकूण वैधता ३६५ दिवसांवरून ४१२ दिवस होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 21-08-2026














