Anand Dighe Death Anniversary: रत्नागिरीत शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन

मारूती मंदिर येथील शिवसेना कार्यालयात प्रतिमा पूजन; नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात आज, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Anand Dighe Death Anniversary) त्यांना भावपूर्ण आदरंजली वाहण्यात आली. या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

रत्नागिरीच्या नगराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख श्री. बिपिन बंदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक श्री. प्रदीप (बंड्या शेठ) साळवी, श्री. सौरभ मलुष्टे, नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, सौ. मेधा कुलकर्णी, सौ. सायली पाटील, सौ. निवेदिता कळबंटे, श्री. प्रशांत सुर्वे, सौ. कामना बेग आणि सौ. संपदा तळेकर यांनी उपस्थित राहून आनंद दिघे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

शिवसैनिकांकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे स्मरण

पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. तुषार साळवी, श्री. संजय हळदणकर, श्री. प्रथमेश साळवी, श्री. सुनिल शिवलकर, श्री. धनंजय नलावडे, श्री. अमोल पावसकर, श्री. रितेश साळवी आणि श्री. मौलवी नदाफ यांच्यासह इतर शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. धर्मवीर आनंद दिघे यांनी दाखवलेल्या तत्त्वांवर चालण्याचा आणि समाजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 26-08-2026