कोकणातील अग्रगण्य न्यूज नेटवर्क ‘रत्नागिरी खबरदार’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

१३ व्या वर्षात यशस्वी पदार्पण; एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जपली वाचकांची विश्वासार्हता

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे आणि सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या ‘रत्नागिरी खबरदार’च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष अंकाचे भव्य प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते पाली (रत्नागिरी) येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी हा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक :

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, नामवंत उद्योजक मुकेश गुंदेचा, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूशेठ म्हाप, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक विजय खेडेकर, उद्योजक वीरेंद्र वणजू, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेवक बंड्या साळवी, उद्योजक केतन पवार, उद्योजक दीपक पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रत्नागिरी खबरदारच्या १३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.

Radhakrushna patapedhi

तंत्रज्ञानाची जोड आणि जिल्ह्यातील पहिली एआय न्यूज सर्व्हिस :

सोशल मीडियाचा कल्पक व प्रभावी वापर करून वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याची अभिनव संकल्पना सर्वप्रथम ‘रत्नागिरी खबरदार’ने राबवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने स्वीकार करत बातमीदारीच्या क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा (AI) वापर करून बातम्या प्रसारित करणारे रत्नागिरी खबरदार हे जिल्ह्यातील पहिलेच डिजिटल वृत्तपत्र ठरले आहे.

१३ वर्षांची अखंड वाटचाल; कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय न्यूज पोर्टल :

आपल्या रोखठोक लेखणीने, वेगवान वार्तांकनाने आणि सातत्यपूर्ण दर्जेदार लिखाणाने रत्नागिरी खबरदारने अल्पावधीतच वाचकांमध्ये प्रचंड विश्वासार्हता निर्माण केली आहे. आज संपूर्ण कोकणात सर्वाधिक क्लिक होणारी आणि वाचली जाणारी आघाडीची न्यूज वेबसाइट म्हणून रत्नागिरी खबरदारने आपले अढळ स्थान निर्माण केले असून, १३ व्या वर्षात पदार्पण करताना डिजिटल पत्रकारितेचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.