Ekka Utsav Ganpatipule: गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे ‘एक्का उत्सव’ उत्साहात संपन्न

दुसऱ्या श्रावण सोमवारी १२ तासांच्या भजनाचे आयोजन; परिसरातील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे (Ekka Utsav Ganpatipule) येथील स्वयंभू गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे जांगल्यांचा ‘एक्का उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दुसऱ्या श्रावण सोमवारी पार पडलेल्या या उत्सवात श्रींच्या प्रदक्षिणा मार्गावर दिवसभर हरिनामाचा गजर घुमत होता.

१२ तासांचा अखंड एक्का उत्सव

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही स्वयंभू श्रींच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान या ठिकाणी सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ८.३० या वेळेत अखंड १२ तासांचा एक्का उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी विविध धार्मिक उपक्रमांसह भजनाचे सूर रंगले.

शिवप्रेमी मित्र मंडळाचे आयोजन व भजनी मंडळांचा सहभाग

या एक्का उत्सवाचे नेटके आयोजन ‘शिवप्रेमी मित्र मंडळ, केदारवाडी गणपतीपुळे’ यांच्या वतीने करण्यात आले होते. या उत्सवामध्ये गणपतीपुळे, मालगुंड, निवेंडी, भंडारपुळे आणि नेवरे या परिसरातील अनेक स्थानिक भजनी मंडळांनी सहभाग घेऊन आपली भजने सादर केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 26-08-2026