रत्नागिरी : आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक, पेन्शन विभाग किंवा पेन्शन वितरण संस्थेच्या कार्यालयात जाण्याची आता गरज नाही.
कारण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आता घरपोच किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पूर्णपणे पेपरलेस असल्याने त्वरित दिले जाणार आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली.
पेन्शनधारकांना ही सेवा फक्त ७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या प्रीमियम खातेधारकांना ५० टक्के सवलत दिली जाते. पेन्शनधारकांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन वितरण विभाग, पेन्शन खाते असणाऱ्या बँकेचे नाव, मोबाईल नंबर व आधार क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र हे केंद्र सरकार, ईपीएफओ किंवा इतर कोणत्याही सरकारचे पेन्शनधारक संस्था इत्यादींना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये अद्ययावत करणे अनिवार्य असते. पोस्ट ऑफिसच्या सेवेचा रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुरळपकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 07-11-2024