रत्नागिरी : कोल्हापूर महामार्गावर रहदारीस व वाहनांच्या वाहतूकीस अडथळा होईल अशी वाहने पार्क करणाऱ्या दोघांविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष विश्राम कोत्रे (वय २८, रा. कापडगांव गुरुनगर, रत्नागिरी) व प्रभु राजू मातीवडर (वय ४१, रा. कुवारबाव रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहे. या घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी पाच ते सात च्या सुमारास कोंडगाव लाड पेट्रोलपंप (ता. संगमेश्वर) येथे निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोत्रे यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र. एमएच-०८ एपी ७३१८) व मातीवडर यांनी डंपर (क्र. एमएच-०८ बीए ३८७९) कोल्हापूर महामार्गावर रहदारीस व वाहनांच्या वाहतूकीस अडथळा होईल असा लावून ठेवला. या प्रकरणी साखरपा पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस प्रताप वाकरे व प्रताप सकपाळ यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 24-09-2024