Maharashtra Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी २०२९ चे ध्येय

शासकीय बैठकांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ बंधनकारक; सोलापूर उन्नत मार्ग आणि कुकडी प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

मुंबई: Maharashtra Cabinet Meeting Decisions संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१ सप्टेंबर) राज्य सरकारची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव अनुपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा प्रभाव; आरोग्यदायी अन्नपदार्थांचे धोरण

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा प्रभाव या बैठकीत पाहायला मिळाला. शासकीय व निमशासकीय बैठका, कार्यक्रम आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यापुढे अशा ठिकाणी संतुलित मेन्यू (Healthy Menu) ठेवणे बंधनकारक असणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले ४ प्रमुख निर्णय:

  • नशा मुक्त महाराष्ट्र अभियान: सन २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of-Government Approach) धोरण जाहीर करण्यात आले. (गृह विभाग)
  • आरोग्यदायी अन्नपदार्थ धोरण: शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान आणि उपहारगृहात संतुलित व आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवणे बंधनकारक. (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • सोलापूर उन्नत मार्ग प्रकल्प: सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानचा उन्नत मार्ग प्रकल्प ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील या प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन ‘NHAI’ ला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • कुकडी पाटबंधारे प्रकल्प: पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांच्या तरतुदीस प्रशासकीय मंजुरी. या निर्णयामुळे सुमारे १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. (जलसंपदा विभाग)

तुकाराम मुंढेंची धडक मोहीम चर्चेत

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने (FDA) राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यांच्या कडक, पारदर्शक आणि शिस्तप्रिय कामकाजामुळे अन्न माफियांवर वचक निर्माण झाला आहे. या धडक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शासकीय स्तरावरही आरोग्यदायी आहाराचे धोरण स्वीकारल्याचे मानले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 02-09-2026