पाण्याच्या टाकीच्या आडोशाला मेन मुंबई मटका खेळवणारा रंगेहाथ पकडला; रोकड आणि साहित्य जप्त
रत्नागिरी: Gambling Case Registered in Ratnagiri संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुगवाडा पांढरासमुद्र परिसरात पाण्याच्या टाकीच्या आडोशाला बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. रोनित निवास भोंगले (वय ३२, रा. पंधरमाड, मुरुगवाडा, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाण्याच्या टाकीच्या आडोशाला सुरू होता खेळ
ही कारवाई सोमवारी सायंकाळी ६.३० वाजनाच्या सुमारास मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. आरोपी रोनित भोंगले हा स्वतःच्या ताब्यात मेन मुंबई मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम बाळगून विनापरवाना मटका जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
शहर पोलिसांची धडक कारवाई
मिळालेल्या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमित राघु पालवे (पोकों/४८४) यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. या कारवाई दरम्यान आरोपीकडून १,५१० रुपयांची रोकड आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण १,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी रोनित भोंगले याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 02-09-2026















