Pimpali Nandivase Bridge Chiplun: पिंपळी-नांदिवसे पूल नोव्हेंबरात न झाल्यास आंदोलनाचा इशारा; मुराद अडरेकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

Pimpali Nandivase Bridge Chiplun: पिंपळी-नांदिवसे पूल नोव्हेंबरात न झाल्यास आंदोलनाचा इशारा; मुराद अडरेकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

१५ गावांतील नागरिक व एमआयडीसी वाहतूक अडचणीत; ६ डिसेंबरपासून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे मार्गावरील वाशिष्टी नदीवरील पूल कोसळून वर्ष उलटत आले तरी पुलाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सुमारे १५ गावांतील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच एमआयडीसी परिसरातील वाहतूक मोठ्या अडचणीत सापडली आहे. पुलाचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, अन्यथा ६ डिसेंबरपासून पर्यायी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.

Pimpali Nandivase Bridge Chiplun च्या कामात दिरंगाई अन् प्रवाशांची कोंडी
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, २०१७ व २०२२ मधील महापुराच्या काळात या पुलावर सुमारे १५ फूट पाणी गेले होते. त्यावेळी पुलाचे रेलिंग व पाईपलाईनचे नुकसान झाले होते. त्यामुळे परिसरातील अनेक मार्ग तसेच एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. २०२३ मध्ये या पुलासाठी सुमारे १.४८ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते, त्यानंतर ते सुमारे १.९८ कोटींपर्यंत सुधारित करण्यात आले आहे. मात्र, निधी व प्रशासकीय प्रक्रियेमुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

पर्यायी मार्गाची दुरवस्था अन् आंदोलनाचा इशारा
पूल कोसळल्यानंतर पर्यायी मार्गाचा वापर सुरू करण्यात आला होता. मात्र हा पर्यायी मार्ग अत्यंत चिंचोळा असून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने गेल्या वर्षभरात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जर नोव्हेंबरअखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर ६ डिसेंबरपासून पर्यायी मार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Hotel waiter

प्रशासनाला निवेदने सादर
या गंभीर संदर्भात जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, एमआयडीसी प्रशासन तसेच उद्योग विभागाकडे रीतसर निवेदन व पत्रव्यवहार करून तातडीने मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली आहे.