विक्रीच्या उद्देशाने बेकायदा साठा; एकावर गुन्हा दाखल
लांजा: लांजा येथील वैभव वसाहत फणसवाडी परिसरात प्लास्टिकच्या शेडमध्ये बेकायदा गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन गजानन कांबळे (वय ४७, रा. लांजा बौद्धवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी दुपारी १:१५ वाजन्याच्या सुमारास करण्यात आली.
Lanja Country Liquor Raid ची घटना अन् पोलिसांची गुप्त कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा वैभव वसाहत फणसवाडी येथील प्रथमेश बामणे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या प्लास्टिकच्या शेडमध्ये राजन कांबळे हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदा गावठी हातभट्टीची दारू बाळगून बसला होता. पोलिसांना याबाबात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकून ही कारवाई केली.
४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त
या छाप्यात पोलिसांनी आरोपीकडून ३८ लिटर गावठी हातभट्टीची दारू असलेला कॅन तसेच प्लास्टिकचे दारू पिण्याचे ग्लास असा एकूण ४ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबलची फिर्याद अन् पुढील तपास
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील महिला पोलीस कॉन्स्टेबल वैष्णवी विजय यादव यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.













