Rajapur Traffic Obstruction Case: नाटेत रस्त्यावर पिकअप उभा करून वाहतुकीस अडथळा; चालकावर गुन्हा दाखल

Rajapur Traffic Obstruction Case: नाटेत रस्त्यावर पिकअप उभा करून वाहतुकीस अडथळा; चालकावर गुन्हा दाखल

नाटे ते धारतळे रस्त्यावरील धोकादायक पार्किंगप्रकरणी नाटे सागरी पोलिसांची कारवाई

राजापूर: नाटे ते धारतळे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अपघातास आमंत्रण ठरेल आणि वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पिकअप वाहन उभे करणाऱ्या चालकाविरोधात नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ सदानंद कठारकर (वय ४९, रा. नाटे गणेशनगर, मूळ रा. धाऊलवल्ली गयाळ कोकरी, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी सायं. ६:३० वाजन्याच्या सुमारास करण्यात आली.

Rajapur Traffic Obstruction Case ची पार्श्वभूमी आणि पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, चालक नवनाथ कठारकर याने त्याच्या मालकीचे ‘टाटा इंट्रा व्ही-३०’ बनावटीचे पिकअप वाहन (क्रमांक MH-08-AP-8239) नाटे ते धारतळे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अत्यंत बेजबाबदारपणे उभे केले होते. या वाहनामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला होता व वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती.

भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद
याप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनाजी पांडुरंग पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ नुसार चालक कठारकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tata sierra