निवडणूक आयोगाची सोशल मीडियावर करडी नजर

राजापूर : पूर्वीसारखे आता कार्यकर्ते सतरंजी उचलण्यापुरते आणि झेंडे हातामध्ये घेऊन घोषणा देण्यापुरते राहिलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे कामही ते करताना दिसत आहेत. त्यामुळे पूर्वी जाहीर सभांच्या माध्यमातून नेत्यांमध्ये रंगणारे आरोप-प्रत्यारोपाचे वाक् युद्ध आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकत्यांमध्ये रंगत आहे. मात्र, निवडणूक आयोगाची सोशल मीडियावरही करडी नजर असल्यामुळे आक्रमक पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळणे आणि आवर घालणे नेत्यांपुढे आव्हान आहे.

राजकीय पक्षांसह नेत्यांकडून कार्यकत्यांची फळी असली तरीही, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कार्यकत्यांना सांभाळण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. त्यामुळे सध्या बेरजेची गणित करताना झाले गेले विसरून कामाला लागण्यासाठी नेते कार्यकत्यांपुढे पायघड्या घालत आहेत. उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवली आहे. त्याचवेळी खासगीमध्ये आकडेमोड करत विजयाच्या मताधिक्क्याचे इमलेही बांधायला सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन कार्यकर्ते प्रचार, प्रसार करत असतानाच तरुण पिढी मात्र सोशल मीडियावर लक्ष्य ठेवून आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 09/Nov/2024