Sangameshwar Deorukh Ketkar Extortion Four Arrested: देवरूख येथील सोने व्यावसायिक अपहरण व खंडणी प्रकरणात आणखी ४ आरोपी जेरबंद

एकूण १३ आरोपी गजाआड

देवरूख / संगमेश्वर: Sangameshwar Deorukh Ketkar Extortion Four Arrested च्या पार्श्वभूमीवर देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण, लूट आणि खंडणी प्रकरणात देवरूख पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. कल्याण येथून दोघांना, नवी मुंबईतून एकाला आणि बारामती येथून एकाला अशा एकूण चार आरोपींच्या पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी केलेल्या या कारवाईनंतर या गुन्ह्यातील अटक आरोपींची एकूण संख्या १३ वर पोहोचली असून, हे चारही जण या प्रकरणातील शेवटचे आरोपी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Sangameshwar Deorukh Ketkar Extortion Four Arrested: आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश राया मोरे, तेजस रघुनाथ तांडेल, दशरथ मारुती साळुंखे आणि सचिन हरिभाऊ खुडे यांचा समावेश आहे. या चौघांना देवरूख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मर्सिडिज कार अडवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम अन् ५ लाखांची खंडणी

ही खळबळजनक घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडली होती. देवरूख मधील मार्लेश्वर फाटा येथील सोने व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) हे आपल्या मर्सिडिज कारने घरी परतत असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या सुमारे १० जणांच्या टोळीने त्यांची कार अडवली. आरोपींनी केतकर यांना जबरदस्तीने स्वतःच्या कारमध्ये बसवून त्यांच्या जवळील १६ लाख रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, तसेच पैसे न दिल्यास डोक्यात कठीण वस्तूने मारून दरीत फेकून देण्याची धमकी दिली होती.

वाटूळ येथे सोडून दिल्यानंतर पोलिसांत तक्रार

अखेर १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी केतकर यांना राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील रस्त्यावर सोडून दिले. यानंतर धनंजय केतकर यांनी देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली, ज्यावरून पोलिसांनी दरोडा, अपहरण व खंडणीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

Tata aeris

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २ पथकांनी रचला सापळा

या प्रकरणात देवरूख पोलिसांनी यापूर्वी ९ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी ७ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून दोघे जामिनावर बाहेर आहेत. उर्वरित ४ आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे आरोपी कल्याण, नवी मुंबई व बारामती परिसरात असल्याचे समजताच देवरूख पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके रवाना करण्यात आली. या पथकाने अत्यंत कौशल्याने सापळा रचून चौघांच्याही मुसक्या आवळल्या.