मंडणगड : दापोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ४ उमेदवार हे मान्यताकृत राजकीय पक्षाचे तर ५ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदार संघातील १९६ मतदान केंद्रावरील प्रक्रियेचे थेट प्रेक्षपण केले जाणार आहे.
दापोली मतदारसंघात एकूण मतदार संख्या २ लाख ९१ हजार २९७ एवढी असून पुरुष १ लाख ३९ हजार ८९५ तर स्त्री मतदार १ लाख ५१ हजार ४०२ आहेत. सर्व्हिस मतदार संख्या २२९ असून गृह मतदानाचा विकल्प ९३० मतदारांनी निवडला आहे. दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३९२ मतदान केंद्र असून त्यापैकी ग्रामीण भागात ३६०, तर शहरी भागात ३२ केंद्रे आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २२ मतदान केंद्र वाढली आहेत. निवडणूक रिंगणात योगेश रामदास कदम (शिवसेना), संजय वसंत कदम (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), संतोष सोनू अबगुल (मनसे), प्रवीण सहदेव मर्चडे (बसपा), योगेश रामदास कदम (अपक्ष), योगेश विठ्ठल कदम (अपक्ष), संजय सीताराम कदम (अपक्ष), संजय संभाजी कदम (अपक्ष), ज्ञानदेव रामचंद्र खांबे (अपक्ष) असे उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी नाव मतदार यादीत शोधण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा अथवा मतदान केंद्रातील केंद्रास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 09/Nov/2024