Traffic Obstruction Ratnagiri: वाहतुकीला अडथळा; शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा खेडशी येथे ७ वाहनचालकांवि्रुद्ध गुन्हा दाखल

इतर वाहनांच्या प्रवासात धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:

Traffic Obstruction Ratnagiri प्रकरणाची माहिती समोर आली असून, शहरानजीकच्या कारवांछीवाडी फाटा खेडशी येथे इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी ७ वाहनचालकांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ व ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी ही कडक पावले उचलली आहेत.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ७ चालकांची नावे

रहीम इब्राहिम शेख (२९, रा. पुनस-लांजा), संजू धनू राठोड (३०, रा. रवींद्रनगर कुवारबाव, रत्नागिरी), वैभव विश्वास खेडककर (३३, रा. खेडशी, रत्नागिरी), ओमकार रमेश गोरे (२३, रा. खेडशी, रत्नागिरी), अतुल विजय शेंबेकर (३८, रा. खेडशी, रत्नागिरी), विष्णुदास विठ्ठलराव बुंदे (५५, रा. खेडशी, रत्नागिरी), सुनील कुगू राठोड (३४, रा. खेडशी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात चालकांची नावे आहेत.

भारतीय न्यायसंहिता कायद्यान्वये कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चालकांनी ७ व ८ ऑक्टोबर रोजी शहरानजीकच्या कारवांछीवाडी फाटा खेडशी येथे आपली वाहने बेशिस्तपणे उभी केली होती, ज्यामुळे इतर वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. याप्रकरणी संबंधितांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Happy journey marathi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-10-2026