४५५ कोटींच्या ठेवी अन् भक्कम आर्थिक स्थिती; अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे गुंतवणूकदारांना आवाहन
रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या वतीने यंदाच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘दसरा-दिवाळी ठेवी योजनेचा’ भव्य प्रारंभ करण्यात आला आहे. ४५५ कोटींच्या ठेवी, ३१७ कोटींचे दिलेले कर्ज आणि २०१ कोटी रुपयांची बँक गुंतवणूक अशी भक्कम व सुरक्षित आर्थिक स्थिती घेऊन संस्था आपल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठेवी योजना घेऊन आली आहे. या ठेवी योजनेत सर्व गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे नम्र आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
भक्कम आर्थिक आकडेवारी आणि सुरक्षिततेची हमी
पत्रकार परिषदेत माहिती देताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, संस्थेची २८% भांडवल पर्याप्तता (Capital Adequacy), ठेवी व कर्जाचे ६३% आदर्श प्रमाण, एस.एल.आर. (SLR) गुंतवणुकीचे २५% प्रमाण आणि निर्माण केलेल्या अन्य निधीची १००% सुरक्षित गुंतवणूक आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पतसंस्थेकडे ५९ कोटी ३९ लाख रुपयांचा स्वनिधी उपलब्ध असून ही आर्थिक आकडेवारी ठेवीदारांच्या गुंतवणुकीस पूर्ण सुरक्षिततेची हमी देते.

Swarupanand Pat Sanstha Festive Deposit Scheme: ‘स्वरूपांजली’ व ‘सोहम’ योजनांवर मिळणारे आकर्षक व्याजदर
सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी पतसंस्थेने खालील विशेष ठेव योजना जाहीर केल्या आहेत:
स्वरूपांजली ठेव योजना (१६ ते १८ महिने):
सर्वसाधारण नागरिक: ८.२५% व्याजदर
ज्येष्ठ नागरिक व महिला: ८.५०% व्याजदर
सोहम ठेव योजना (१९ ते ३६ महिने – मासिक व्याज):
सर्वसाधारण नागरिक: ८.५०% व्याजदर
ज्येष्ठ नागरिक व महिला: ८.७५% व्याजदर
५० हजारांहून अधिक सभासदांचा विश्वास
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची सभासद संख्या आज तब्बल ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. या नवीन व सुरक्षित ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून सर्व ठेवीदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप अर्थ परिवारात’ सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा केले आहे.













