*दापोलीत सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात! मोबाईल हॅक करून युनियन बँक खात्यातून २ लाख ३४ हजार रुपयांची सायबर फसवणूक*

*दापोलीत सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात! मोबाईल हॅक करून युनियन बँक खात्यातून २ लाख ३४ हजार रुपयांची सायबर फसवणूक*

गुगल पे बंद पडल्यानंतर सात दिवसांनी खात्यात शिल्लक उरले फक्त ९०६ रुपये; गिम्हवणे येथील ४२ वर्षीय नोकरदाराची फसवणूक, दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी) :
मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आलेल्या एका मेसेजवर क्लिक करणे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील एका ४२ वर्षीय नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाईल हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजमुळे मोबाईल हॅक; सात दिवस गुगल पे बंद :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिम्हवणे तेलीवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी निलेश सुर्यकांत झगडे (वय ४२ वर्षे, व्यवसाय- नोकरी) यांच्याकडे ‘OnePlus Nord 2T 5G’ हा मोबाईल फोन आहे. गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या मोबाईलवर सॉफ्टवेअर अपडेटसाठी एक मेसेज आला होता. मोबाईल अपडेट करण्याच्या उद्देशाने फिर्यादींनी त्या मेसेजवर क्लिक केले. त्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक होऊन अचानक गरम होऊ लागला आणि मोबाईलची बॅटरी वेगाने उतरू लागली. तसेच, त्यांच्या मोबाईलमधील ‘गुगल पे’ (Google Pay) ॲप बंद पडले.

गुगल पे सुरू होताच धक्का; बँक खात्यात शिल्लक उरले फक्त ९०६ रुपये :
फिर्यादींनी गुगल पे सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मोबाईलमध्ये चालत नव्हते. अखेर सात दिवसांनंतर, गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमधील गुगल पे ॲप आपोआप सुरू झाले. त्यानंतर फिर्यादी निलेश झगडे यांनी गुगल पे वरून आपल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासली असता, खात्यात केवळ ९०६ रुपये शिल्लक असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. खात्यातून पैसे वजा झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेतून खाते स्टेटमेंट प्राप्त केले. या स्टेटमेंटवरून दिनांक १० जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादींच्या संमतीशिवाय वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडीद्वारे त्यांच्या खात्यातून वेळोवेळी एकूण २ लाख ३४ हजार १ रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

Anant hights

दापोली पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंद :
याप्रकरणी फिर्यादी निलेश सुर्यकांत झगडे यांनी शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.१६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.