Raj Thackeray: परिसीमन विधेयकावरून शरद पवार गटावर टीकेची झोड; राज ठाकरे यांचा ‘जंतरमंतर’ म्हणत खोचक टोला

Raj Thackeray: परिसीमन विधेयकावरून शरद पवार गटावर टीकेची झोड; राज ठाकरे यांचा 'जंतरमंतर' म्हणत खोचक टोला

राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट; विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांचीही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भूमिकेवर तीव्र टीका

Raj Thackeray यांनी केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाला शरद पवार गटाने पाठिंबा दर्शवल्याच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर खोचक पोस्ट करत जोरदार टीका केली आहे. शरद पवार गट आणि डीएमकेने पाठिंबा दिल्यामुळे लोकसभेत परिसीमन विधेयक मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयानंतर राज्यभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेससोबतच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही २ जुलै २०२३ मधील आपल्या इशाऱ्याची आठवण करून देत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "२ जुलै २०२३ ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो." या पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आतून एकच होते आणि ते दोघांमध्ये फूट पडल्याचे नाटक करत होते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

Raj Thackeray यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांची टीका
परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही शरद पवार गटावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे:

Shanti real estate 1

विजय वडेट्टीवार (काँग्रेस नेते): जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केल्यानंतर वडेट्टीवार यांनी टीका केली. शरद पवार खासदार व्हावेत म्हणून आम्ही त्याग केला आणि आज त्याच शरद पवारांनी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पाठीत खंजीर खुपसला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संजय राऊत (शिवसेना खासदार): ज्यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला आहे, ते २१ व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच ज्यांनी पायाखालची जमीन वाचवण्यासाठी देश खड्ड्यात ढकलला त्यांना काळ आणि जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.