Ratnagiri Water Scarcity Plan Collector Directives: पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करा! दुष्काळी पंचनामे त्रुटीरहीत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

Ratnagiri Water Scarcity Plan Collector Directives: पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करा! दुष्काळी पंचनामे त्रुटीरहीत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

एकही टंचाईग्रस्त गाव वा वाडी उपायांपासून वंचित राहू नये; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाणीटंचाई व पीक पंचनाम्यांचा आढावा

रत्नागिरी: जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजनांचे नेटके नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व गावांचे सखोल सर्वेक्षण करून पाणीटंचाई आराखडा विनाविलंब सादर करावा. नियोजन करताना जिल्ह्यातील एकही टंचाईग्रस्त गाव किंवा वाडी उपाययोजनांपासून वंचित राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे कडक निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेत डिसेंबरपूर्वी आणि डिसेंबरनंतर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

भूजल मॅपिंग अन् रोजगार हमी योजनेचा आराखडा
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्या गावांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे, त्यांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tata SUV

सर्व तहसीलदारांनी रोजगार हमी योजनेच्या (MNREGA) अनुषंगाने आवश्यक आराखडा त्वरित सादर करावा.

भूजल अधिनियमानुसार जिल्ह्यातील जलस्रोतांचे मॅपिंग करून त्याचा स्वतंत्र अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.

Ratnagiri Water Scarcity Plan Collector Directives: "पंचनाम्यात एकही शेतकरी सुटू नये; यादी ग्रामपंचायतीत लावा"

जिल्ह्यात सुरू असलेल्या दुष्काळी पीक पंचनाम्यांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाला आवश्यक आकडेवारी वेळेत सादर करण्यासाठी पंचनाम्यांचे काम अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने पूर्ण करावे. या प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहणार नाही आणि पंचनाम्यात कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची दक्षता अधिकारीवर्गाने घ्यावी.

पारदर्शकता राखण्यासाठी आणि ग्रामस्थांना माहिती मिळण्यासाठी पीक पंचनाम्यांची अंतिम यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, उपकार्यकारी अभियंता स्नेहल माईणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ए. ए. कांबळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गोंधळी आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.