Nashik SSB Training वर्गासाठी पात्र इच्छुकांची १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणार मुलाखत
रत्नागिरी:
Nashik SSB Training उपक्रमांतर्गत भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यास उत्सुक असलेल्या पात्र युवक-युवतींसाठी नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड (नाशिक) येथे राज्य शासनाच्या वतीने १९ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत हे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची मुलाखत १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बिरादार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र आणि अर्जाची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी पुणे सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ‘DSW Portal (Resources Nashik – SSB ६७)’ या लिंकवरून किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वरून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रत डाउनलोड करून घ्यावी. डाऊनलोड केलेले हे प्रवेशपत्र पूर्ण भरून मुलाखतीच्या वेळी सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता
या मोफत प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे:
उमेदवार कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.
उमेदवाराने एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा ‘A’ किंवा ‘B’ श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी आणि एनसीसी ग्रुप मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेससाठी (TGC) एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर प्राप्त असावे.
युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम (UES) अंतर्गत एसएसबी कॉल लेटर प्राप्त असावे किंवा शिफारस यादीत नाव समाविष्ट असावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
या पूर्व प्रशिक्षण वर्गाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













