ALH MK 3 Helicopter Ratnagiri: रत्नागिरीत तटरक्षक दलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक ‘एएलएच एमके ३’ हेलिकॉप्टर दाखल; ‘वॉटर कॅनन सॅल्यूट’ देऊन भव्य स्वागत

ALH MK 3 Helicopter Ratnagiri: रत्नागिरीत तटरक्षक दलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक 'एएलएच एमके ३' हेलिकॉप्टर दाखल; 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देऊन भव्य स्वागत

स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज ALH MK 3 Helicopter Ratnagiri कोस्ट गार्ड एअर स्टेशनवर तैनात; पश्चिम किनारपट्टीची सागरी सुरक्षा होणार अधिक भक्कम

रत्नागिरी :
किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘ALH MK 3 Helicopter Ratnagiri’ मधील कोस्ट गार्ड एअर स्टेशनच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट झाले आहे. भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरी येथील कोस्ट गार्ड एअर स्टेशनसाठी पाच ‘एएलएच एमके ३’ (ALH MK-3) या स्वदेशी बनावटीच्या प्रगत हलक्या हेलिकॉप्टर्सची तैनाती निश्चित केली आहे. त्यापैकी पहिले हेलिकॉप्टर रत्नागिरीत दाखल झाले असून, कोस्ट गार्ड एअर स्टेशन, रत्नागिरी येथे पारंपारिक ‘वॉटर कॅनन सॅल्यूट’ देऊन या विमानाचे भव्य स्वागत करण्यात आले.

अत्याधुनिक रडार आणि १२.७ मिमी हेवी मशीन गनने सुसज्ज
रत्नागिरीत एएलएच एमके-३ चा समावेश झाल्याने पश्चिम किनारपट्टीवरील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर प्रगत रडारने सुसज्ज असून, त्यात इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमद्वारे लांब पल्ल्याच्या इमेजिंग आणि ओळखण्याच्या क्षमतेचा समावेश आहे. याशिवाय, लक्ष्याला निष्प्रभ करण्यासाठी विमानाच्या केबिनमध्ये १२.७ मिमी हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. यातील पाळत ठेवणे, शोधणे, ओळखणे आणि तात्काळ प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे विशेषतः महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर, ईईझेड (EEZ) व राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची भारतीय तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

८३१ स्क्वॉड्रनच्या क्षमतेत होणार वाढ
तटरक्षक ८७५ चा समावेश विशेष महत्त्वाचा आहे, कारण रत्नागिरी येथे ८३१ स्क्वॉड्रन (तटरक्षक) मध्ये तैनात करण्यात येणाऱ्या ५ एएलएच एमके-३ विमानांपैकी हे पहिले विमान आहे. उर्वरित विमानांचा टप्प्याटप्प्याने समावेश केला जाणार असून, यामुळे स्क्वॉड्रनच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल. परिणामी, तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) च्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात सतत हवाई पाळत ठेवणे आणि जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

Tata harrier

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत भरारी
भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनानुसार, एएलएच एमके ३ विमानाचा समावेश हे तटरक्षक दलाच्या उड्डाण क्षेत्रात स्वदेशी क्षमता व स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने टाळलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमांतर्गत करारबद्ध झालेल्या एकूण नऊ विमानांपैकी, मेसर्स एचएएल (HAL) सोबतच्या नवीन करारांतर्गत भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट होणारे सीजी ८७५ हे पाचवे एएलएच एमके-३ विमान आहे. या प्रगत प्लॅटफॉर्मच्या समावेशामुळे तटरक्षक दलाची रोटरी-विंग विमान क्षमता अधिक बळकट होईल.

शोध, बचाव आणि आपत्कालीन मोहिमांना मिळणार गती
या हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे देशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर आणि ईईझेडमध्ये सतत सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्य, प्रदूषण नियंत्रण आणि इतर सागरी ऑपरेशन्स प्रभावीपणे हाती घेण्याची क्षमता वाढणार आहे. ८३१ स्क्वॉड्रन आयसीजीएएस (ICGAS) रत्नागिरीच्या कार्यक्षमतेतील या समावेशामुळे सागरी सुरक्षेच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.