Ratnagiri October Heat: रत्नागिरीत ऑक्टोबर हिटचा कहर; तापमानाचा पारा ३९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण

Ratnagiri October Heat: रत्नागिरीत ऑक्टोबर हिटचा कहर; तापमानाचा पारा ३९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण

वाढत्या उन्हामुळे ११४ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा; दुपारी उन्हाची तीव्रतेत प्रचंड वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, मंगळवारी तापमानाने ३९.२ अंश सेल्सिअसचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. वाढत्या उन्हामुळे रत्नागिरीकर कमालीचे हैराण झाले असून, ऑक्टोबर महिन्यातील १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा केला जात आहे. यंदाचे तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक असल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाची ओढ आणि उकाड्यात वाढ
जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी त्यानंतर पावसाने दिर्घकाळ ओढ दिली. त्यातच आता ऑक्टोबर हिटच्या तीव्रतेने भर घातल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तीव्र उकाडा जाणवत असून, दिवसा कडक ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण आणि रात्रीही उष्णतेचा त्रास जाणवत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांसाठी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन

Tata punch

वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दुपारी कामासाठी बाहेर पडताना अनेकजण टोपी, तोंडावर रुमाल आणि गॉगलचा वापर करत आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर वाहनांची वस्ती देखील कमी असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर १९५७ रोजी रत्नागिरीत ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

scorching sun: भर उन्हात शेतकऱ्यांची भात कापणी सुरू

एकतडे तापमानाचा पारा प्रचंड वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाची पर्वा न करता शेतकरी सध्या शेतात दिवसभर राबत असून, वेळेत कापणी पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तापमान ३९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता अधिकच अधोरेखित झाली आहे. मात्र, १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा अधिकृत हवामान नोंदींनुसार पडताळणी करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.