Hatkhamba Youth Kidnapping: हातखंबा येथून राजस्थानच्या तरुणाचे अपहरण; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Hatkhamba Youth Kidnapping: हातखंबा येथून राजस्थानच्या तरुणाचे अपहरण; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

राजस्थानला जाण्यासाठी निघालेला तरुण बेपत्ता; १२ ऑक्टोबरला ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

रत्नागिरी: Hatkhamba Youth Kidnapping प्रकरणी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील एका ढाब्यावरून राजस्थान येथील एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुनील कुमार गणपतलाल वर्मा (वय २३, मूळ रा. बिचपूडी, देवीपुरा, जयपूर-राजस्थान) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमरचंद प्रभाताराम यादव (वय ३६, मूळ रा. जयपूर-राजस्थान, सध्या रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) यांनी १२ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत खबर दिली.

तक्रारीनुसार, सुनील वर्मा हा २ ऑगस्ट रोजी राजस्थानला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील ईश्वर ढाबा, हातखंबा येथून निघाला होता. मात्र, तो अद्याप आपल्या घरी पोहोचलेला नाही.

Arihant 2

Hatkhamba Youth Kidnapping: नातेवाईक व मित्रांकडे चौकशीनंतर पोलिसांत धाव

सुनील वर्मा घरी न पोहोचल्यामुळे फिर्यादी यांनी त्याच्या नातेवाईकांकडे, मित्र परिवाराकडे तसेच त्याच्या कामाच्या ठिकाणी सर्वत्र शोध घेतला व चौकशी केली; परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे सुनील वर्मा याचे कोणीतरी अपहरण केल्याची पक्की खात्री झाल्यानंतर फिर्यादी अमरचंद यादव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४० (३) व भादंवि कायदा कलम ३६५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.