खेड रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर अंधार; रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर अंधार; रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्थानकाच्या सुशोभीकरणाकडे लक्ष, मात्र अपुरी प्रकाशव्यवस्था आणि दिव्यांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी

खेड:
Khed Railway Station Lighting Issue: खेड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. स्थानकाचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले असले, तरी तिथे अद्याप योग्य दिवे बसवण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

खेड रेल्वे स्थानकावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. विशेषतः, रात्रीच्या वेळी स्थानकावर येणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेशद्वार परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, दिव्यांच्या अभावामुळे हा परिसर पूर्णपणे अंधारात राहत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Khed Railway Station Lighting Issue: प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाबरोबरच प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली असताना तिथे सुरुवातीपासूनच प्रकाशव्यवस्था का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Radhakrushna patapedhi

संबंधित रेल्वे प्रशासनाने या समस्येची तातडीने गंभीर दखल घेऊन प्रवेशद्वारात आकर्षक आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी आक्रमक मागणी मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष व समाजसेवक प्रसाद गांधी यांनी केली आहे. प्रवाशांना रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.