रत्नागिरी : क्युआर कोड वापराबाबत अनेक अडचणी

रत्नागिरी : घनकचऱ्यावर विशेष नजर ठेवण्यासाठी राबवण्यात येणारा आयसीटी (इन्फर्मिशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉगी) बेस्ड प्रणालीचा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच गुंडाळण्याची शक्यता आहे. शहरातील सुमारे ३० हजार मालमत्तांवर ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर (कचऱ्याचा डबा) विशिष्ट क्युआर कोड लावण्यात येणार होते. संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केला जाणार होता. यामुळे नियमित कचरा कोणाचा येतो आणि कोण टाळाटाळ करतं, यावर पालिकेचे लक्ष राहणार होते. वर्ष व्हायला आले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही यामध्ये अनेक अडथळे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून घनकचऱ्याच्या संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया यावर पालिकेने भर दिला आहे. दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी आयसीटी बेस्ड प्रणाली कार्यरत केली आहे. या अंतर्गत विविध शहरांमध्ये ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट कोडचे स्टॉकर लावण्यात येत आहेत. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जाणार आहेत.

स्कॅन केल्यानंतर याची माहिती ऑनलाईन अॅपमध्ये मिळणार आहे. या अॅपवर शहरात कोणत्या भागात कचरा घेण्यात आला आहे, याची माहिती मिळणार आहे. या अॅपवर शहरात कोणत्या भागात कचरा घेण्यात आला आहे, याची माहिती मिळणार आहे. हि आधुनिक प्रणाली रत्नागिरी शहरात कार्यान्वित करण्यात येणार आहे.

शहरातील सर्व मिळकती व प्रत्येक घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याच डस्टबिनकर क्युआर कोड स्टीकर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. क्युआर कोड स्कैनिंगद्वारे संपूर्ण शहरातील रोजच्या कचरा संकलनाची माहिती अॅपवर पालिकेला मिळणार आहे. रोजचे कचरा संकलनाचे टेंडर देण्यात आलेले असून, घंटागाडी चालकांना प्रत्येक भागात संकलन करावे लागणार आहे एखाद्या भागातून कचरा घेतला नाही तर त्याची माहिती अॅपवर मिळणार असून, पालिकेला कार्यवाही करणे सोपे होणार आहे. दररोज ठराविक वेळेत शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा गोळा करावा लागणार आहे; परंतु वर्ष व्हायला आले तरी अजून पुढची कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यात अनेक अधिकान्याली क्यूआर कोड स्कॅनबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

कर्मचारी कचऱ्याचा डबा घेणार की खराब हाताने मोबाईल कडून क्यूआर कोड स्कॅन करणार, त्यामुळे या प्रणालीच्या वापराबाबत साशंकता असून, हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अडचणी वरिष्ठांच्या कानावर
पालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी अंमलबजावणीला होणारा उशीर तर कचऱ्याचा डब्याला लावलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत वरिष्ठांना कळवले आहे. त्यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्याने शासनाचा हा प्रकल्प लांबता असून तो गुंडाळण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 09/Nov/2024