Khed Theft Case Veral: खेडमधील वेरळ येथे समर्थ कृपा विश्व परिसरात दोन रो-बंगले फोडले; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह इम्पोर्टेड घड्याळे लांबवली

Khed Theft Case Veral: खेडमधील वेरळ येथे समर्थ कृपा विश्व परिसरात दोन रो-बंगले फोडले; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह इम्पोर्टेड घड्याळे लांबवली

व्या व्यावसायिक सूरज शेट्टी व प्रसन्न चांदुगडे यांच्या घरात घरफोडी; तपासासाठी रत्नागिरीतून श्वानपथक दाखल

Khed Theft Case Veral च्या या घटनेमुळे खेड तालुक्यातील वेरळ परिसरात सुरक्षा व्यवस्था व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेरळ येथील समर्थ कृपा विश्व परिसरात चोरट्यांनी शेजारील दोन रो-बंगल्यांना लक्ष्य करत मोठी घरफोडी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत व्यावसायिक सूरज शेट्टी यांच्या बंद घरातून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मौल्यवान इम्पोर्टेड घड्याळे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या लगतच असलेल्या प्रसन्न शरद चांदुगडे यांच्या बंगल्यातही चोरट्यांनी घरफोडी केली आहे.

सफाई कामगाराच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ कृपा विश्व परिसरात व्यावसायिक सूरज शेट्टी यांचा बंगला असून, ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद होते. सकाळी परिसराची नियमित साफसफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कामगाराला शेट्टी यांच्या घराचा मुख्य दरवाजा थोडासा उघडा असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी तातडीने शेट्टी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कल्पना दिली. शेट्टी यांनी आपल्या नातेवाईकांना तात्काळ बंगल्यावर पाहणीसाठी पाठवले असता घरात घरफोडी झाल्याचे उघड झाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीत शेजारील प्रसन्न चांदुगडे यांचाही बंगला फोडल्याचे स्पष्ट झाले.

Khed Theft Case Veral तपासासाठी रत्नागिरीवरून श्वानपथक पाचारण
या घरफोडीचा सुगावा लावण्यासाठी खेड पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी येथून विशेष श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने घटनास्थळापासून घराच्या मागील बाजूने समर्थ कृपा विश्वच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि तेथून पुढे सर्व्हिस रोडपर्यंत माग काढला आहे. चोरट्यांनी घरफोडीनंतर कोणत्या मार्गाने पलायन केले, याचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Kohinoor furni.1

नुकसानीचा नेमका अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू
सूरज शेट्टी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व घड्याळे चोरीला गेली असली, तरी दोन्ही कुटुंबीय बाहेरगावी असल्याने एकूण आर्थिक नुकसान आणि वस्तूंचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. बंद घरांचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.