Action Against Illegal LED Fishing Ratnagiri: रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अवैध एलईडी मासेमारीवर कडक कारवाईचे आदेश; मत्स्य व्यवसाय विभाग ॲक्शन मोडमध्ये

Action Against Illegal LED Fishing Ratnagiri: रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अवैध एलईडी मासेमारीवर कडक कारवाईचे आदेश; मत्स्य व्यवसाय विभाग ॲक्शन मोडमध्ये

सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गस्ती पथक तैनात; मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आज घेणार विशेष आढावा बैठक

LED fishing action अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या अवैध एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे कडक आदेश मत्स्य व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सहाय्यक आयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भाduले यांनी कारवाईत कोणतीही शिथिलता न ठेवता नियमित गस्त घालण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. त्यानुसार कारवाईची तयारी करण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारी दिवसभर धावपळ सुरू होती.

गस्तीसाठी खासगी नौकेचा शोध आणि यंत्रणेची तयारी
जिल्ह्यात गस्तीसाठी आवश्यक असलेली ‘रामभद्रा’ नौका अद्याप उपलब्ध नसल्याने कारवाईसाठी खासगी नौका मिळवण्याचे प्रयत्न विभागाकडून सुरू आहेत. जिल्हा कार्यालयांतर्गत स्वतंत्र पथक स्थापन करून रविवारपासून नियमित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी दापोलीतील हर्णे जेटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्यासह जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय बैठका आणि मंत्री घेणार आढावा
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवविरोधात कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश देवरे यांनी कारवाईसाठी पथक तयार करून कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. उपायुक्त नागनाथ भाडुले यांनीही कारवाई नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे आता प्रत्यक्ष कारवाईकडे लक्ष लागले आहे. तसेच मत्स्य व्यवसायमंत्री सोमवार (आज) एलईडी मासेमारीविरोधातील कारवाईचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी आवश्यक माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त महेश देवरे यांनी दिल्या असून, त्यामुळे विभागातील अधिकारी कामाला लागले आहेत.

Amey jwelrs