रत्नागिरी : रत्नागिरीतील कार्तिकी एकादशीनिमित्त भरणाऱ्या जत्रेत दुकाने थाटण्यासाठी जिल्ह्याबाहेरील व्यावसायिक रविवारपासूनच रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दुकानातील वस्तूंसह आलेली ही मंडळी जागा अडवून ठेवू लागले आहेत.
रत्नागिरीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी जत्रा भरते. या जत्रेनिमित्त जिल्ह्यातील दुकानदारांसह जिल्ह्याबाहेरील व्यावसायिकही आपली दुकाने थाटतात. विठ्ठल मंदिर परिसरासह रामआळी, गोखलेनाका, मारुती आळी, गाडीतळपर्यंत व्यावसायिक आपली दुकाने दरवर्षी थाटतात. मंगळवारी १२ रोजी होणाऱ्या या जत्रेसाठी रविवारपासूनच जिल्ह्याबाहेरील व्यावसायिक आपल्या दुकानातील वस्तूंसह रत्नागिरीत दाखल होवू लागले आहेत. या जत्रेत स्थानिक दुकानदारांसह जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांचीही दुकाने असतात. रात्रीच्या वेळी भक्तांची तुफान गर्दी होते. अनेक दुकाने रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांच्या बाहेर थाटली जातात. अशावेळी त्या दुकानाबाहेर बसण्यासाठी बाहेरून येणारे व्यावसायिक त्या दुकानदारांची परवानगी घेवू लागले आहेत. त्याचवेळी काहीजण आपल्या दुकानासाठी जागा अडवून ठेवू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 11/Nov/2024