Ratnagiri : पावस येथे विनापरवाना मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; साहित्यासह मुद्देमाल जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी आपली धडक मोहीम सुरूच ठेवली आहे. तालुक्यातील जुवेवाडी-पावस येथे विनापरवाना मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी ताजी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय विजय मयेकर (वय २८, रा. जुवेवाडी-पावस, रत्नागिरी) असे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २४) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पावस-पुनस फाटा येथील रस्त्याच्या बाजूला जुवेवाडी येथे करण्यात आली.

LCB च्या हेड कॉन्स्टेबल विनोद कदम यांनी दिली तक्रार

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संशयित अक्षय मयेकर हा पावस-पुनस फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला विनापरवाना मटका जुगाराचे साहित्य आपल्या ताब्यात घेऊन अवैध व्यवसाय चालवत असताना पोलिसांना रंगेहाथ सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद कदम यांनी पुर्णगड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुर्णगड पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Kore Mobile

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 26-06-2026