Horoscope Today 7 November 2026: ७ नोव्हेंबर २०२६ चे संपूर्ण राशीभविष्य; जाणून घ्या शनिवारचा दिवस १२ राशींसाठी कसा राहील?

Horoscope Today 7 November 2026: ७ नोव्हेंबर २०२६ चे संपूर्ण राशीभविष्य; जाणून घ्या शनिवारचा दिवस १२ राशींसाठी कसा राहील?

Horoscope Today 7 November 2026: वैदिक पंचांगानुसार, आज शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. आजच्या दिवशी ग्रहांची विशेष हालचाल आणि दुर्लभ संयोगामुळे सर्व १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यावर याचा संमिश्र प्रभाव पडणार आहे. शनिदेवांच्या कृपेने आजचा दिवस कोणत्या राशीसाठी फलदायी ठरेल आणि कोणाला सावध राहावे लागेल, पाहा सविस्तर राशीभविष्य.

१. मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही घरामधील कर्त्याव्य व जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्याल, ज्यामुळे घरातील लोकांकडून तुमची प्रशंसा केली जाईल आणि सर्वांची वाहवा मिळवाल.

२. वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस जबाबदाऱ्यांचा असणार आहे. आज तुम्ही नवीन जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने हाताळाल. मात्र, हे सर्व करताना तुमच्या वागण्यात थोडा विक्षिप्तपणा इतरांना जाणवू शकतो.

३. मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या उत्तम राहील. आज तुमची पैशांची स्थिती सुधारेल. मात्र, घरातील महिलांना काही बाबतीत थोडी मानसिक अस्थिरता जाणवू शकते.

Infigo eyecare

४. कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा संघर्षाचा आणि कष्टाचा असणार आहे. आज तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. तसेच, परिस्थितीशी झगडण्यात तुमची बरीच शक्ती खर्च होऊ शकते.

५. सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस घरगुती कामांमध्ये जाईल. आज तुम्ही घरामधील साफसफाई आणि स्वच्छता याकडे जरा बारकाईने लक्ष द्याल. तसेच, स्वतःसाठी नवीन वस्त्र खरेदी करण्याचा हा काळ आहे.

६. कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. एखाद्या गोष्टीतून सुख कसे मिळवावे हे तुम्हाला कोणालाही सांगावे लागणार नाही. आज तुमच्यातील उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसेल.

७. तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. आज नवीन लोकांशी ओळखी होतील आणि मित्रपरिवाराच्या गाठीभेटीही पडतील. मात्र, आज कोणावरही टीका करणे टाळावे.

८. वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संयмя बाळगण्याचा आहे. आज तुमच्या हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातली तर ते तुमच्या फायद्याचे ठरेल. आज तुम्ही कोणाचाही विरोध फारसा सहन करू शकणार नाही.

९. धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. आज तुमचा अतिस्पष्टवक्तेपणा टाळण्याकडे कल ठेवावा. घरातील महिलांना कौटुंबिक जीवनात उत्तम समाधान लाभेल.

१०. मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस कलागुणांना वाव देणारा असेल. आज तुमच्यातील कलाप्रेम उफाळून येईल आणि तुम्हाला तुमच्या विविध कलागुणांना उत्तम वाव मिळताना दिसून येईल.

११. कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक नियोजनाचा आहे. आज तुमच्या हातून काही नावीन्यपूर्ण गोष्टी घडतील. तसेच, योग्य आर्थिक नियोजन करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवून टाकण्याचा हा काळ आहे.

१२. मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आज स्पष्टपणे दिसून येईल आणि त्याचे अचूक सादरीकरण आज तुमच्या हातून होईल.